Posts

कवितेस.....

  कवितेस.... अंतरातली साद सुखाची निर्मळ सुंदर तूच साधना ,ध्यान धारणा तुझ्यात ईश्वर नित्य तरूणी सरस्वती तू स्निग्धा केवळ कविते तू गं शब्दांमधला अनंत परिमळ छंद म्हणू की वसा म्हणू मी तुला कविते नसते रंजन तू तर माझी प्रतिमा असते गंभीर कधी संन्यासी तू जोगी असते कन्या कधी तू अवखळ अल्लड हट्टी असते क्षणात हसते लपते जणु की श्रावणधारा इंद्रधनुपरी उधळित येते रंगपिसारा कविते तू गं पाउस अन मी भिजते मन-मन तू येताना मनात फुलतो अंकुर नूतन शब्दमाधवी चांदण्यापरी सुखद निरंतर सुखदुःखाची साथसंगिनी कोमल बंधन दिलीस छाया, दिलीस कविते मना उभारी पंख दिले अन म्हणालीस तू घेइ भरारी.... लिना यादव ०२.१०.२०२०